डेटॉल, हार्पिक उत्पादन असलेला RB ग्रुप करणार ऑरीकमध्ये मोठी गुंतवणूक

0
3828

डेटॉल, हार्पिकचे इत्यादीआरोग्य, स्वच्छता आणि घरगुती उत्पादनांचे उत्पादक असलेल्रेया रेकिट बेन्कीझर ग्रुप (आरबी ग्रुप) ही ब्रिटिश बहुराष्ट्रीय ग्राहक वस्तूंची कंपनी लवकरच औरंगाबाद येथील शेंद्रा ऑरीक येथे गुंतवणूक करणार आहे. या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी मागील महिन्यात ऑरीक येथे भेट देऊन गुंतवणुकीसंदर्भात सकारत्मक पाऊले टाकली आहे.

शेंद्र येथील भेटीदरम्यान त्यांनी पहिल्या टप्प्यासाठी 50 एकर जागेसाठी मागणी केली असून दुसऱ्या टप्प्यात 100 एकर जागेवर विस्तार करण्यात येणार आहे. कंपनी नवीन प्लांटसाठी सुमारे 500 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार असून, स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विस्तारीकानाचा भाग म्हणून शेंद्रा प्रकल्पाकडे बघितले जात आहे.

रेकिट बेन्कीझर ग्रुपमध्ये Dettol, Harpic, Lysol, Veet, Vanish, Woolite, Finish, Cilit Bang, Calgon, Durex, Scholl Mycil Air Wick, Strepsil, Clearasil, Nurofen, Disprin इत्यादी उत्पादनाचा समावेश आहे.
‘हेल्थ, हायजीन, होम’ टॅगलाइन असलेल्या या कंपनीच्या औरीक्मधील गुंतवणुकीमुळे स्वच्छ भारत अभियानाला हातभार लागणार आहे.

 

लवकरच होणार अधिकृत घोषणा

केंद्रसरकारच्या संकेतस्थळावर या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ऑरीक येथे भेट दिल्या संदर्भात माहिती प्रदर्शित केली असून, सद्य कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या गुंतवणुकी संदर्भातील अधिकृत घोषणा मी महिन्यामध्ये अपेक्षित असल्याचे ऑरीक अधिकाऱ्यांनी सांगितले. ह्योसंग, NLMK या नंतर RB ग्रुपने मोठ्या भूखंडाबद्दल मागणी केल्याने शेंद्र येथील वसाहतीमधले भूखंड लवकरच संपतील याबाबत अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Previous articleऔरंगाबाद शहरात 4 नवीन पॉसिटीव्ह रुग्ण, कोरोना बधितांचा संख्या 24
Next articleऔरंगाबादः लॉकडाऊननंतरचा कल, आव्हाने आणि उपाययोजना (भाग-१)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here