मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मागील सरकारनं सुरु केलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प बंद होणार नसल्याचं सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलंय. आज मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मराठवाड्यातील नेत्यांची बैठक पार पडली.
मुंबई | पाणीप्रश्नावर मराठवाड्यातील नेत्यांची अजित पवारांसोबत चर्चा
मुंबई | पाणीप्रश्नावर मराठवाड्यातील नेत्यांची अजित पवारांसोबत चर्चा Watch video on 24 Taas, Zee News Marathi
अजित पवारांनी औरंगाबाद येथे घेतेलेल्या आढावा बैठकीमध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
आधीच्या सरकारच्या काळात महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजना गुंडाळण्याचे संकेत नवीन सरकारकडून देण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड योजना स्थगिती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात असतांनाचमराठवाड्यातील आमदारांनी अजित पवानाशी घेतलेली भेट या प्रकल्पाच्या भवितव्यासाठी महत्वपूर्ण मानली जात आहे.
मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी फडणवीस सरकारने वॉटर ग्रीड ही महत्त्वकांक्षी योजना आखली होती. या योजनेचं काम एका खासगी कंपनीला देण्यात आलं होतं. या योजनेसाठी अंदाजे 15 हजार कोटी दिले होते. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, अशा ठिकाणचं पाणी कोरडवाहू भागात आणण्याची ही योजना होती.
काय आहे मराठवाडा वॉटर ग्रीड?
- कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यासाठी पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी आणि उद्योगांच्या पाण्याचं एकत्रित ग्रीड करण्यात येईल.
- दुसऱ्या टप्प्यात दमनगंगा-पिंजाळ, तापी-नार-पार आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी आणि कृष्णा खोऱ्यातील 7 टी. एम. सी. पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचे नियोजन आहे.
- मराठवाडा ग्रीडमध्ये 1 हजार 330 किलोमीटर मुख्य पाईपलाईन असेल. यात 11 धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव, ) लूप पद्धतीने जोडण्यात येतील.
- त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करुन तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी 3 हजार 220 किलोमीटर दुय्यम पाईप (Secondary) लाईन प्रस्तावित आहे.
प्रस्तावित ग्रीडची ठळक वैशिष्ट्ये
- लूप पद्धतीमुळे एका ठिकाणाहून पाणी उपलब्ध न झाल्यास दुसऱ्या ठिकाणचंही पाणी देता येईल.
- दोन्ही दिशांना पाणी वाहून नेण्याची (उलट प्रवाह-Bidirectional) सुविधा असल्यामुळे दोन्ही बाजूंनी एका पाईपलाईनद्वारे पाणी हस्तांतरित केले जाऊ शकते.
- एखाद्या साठ्यात अतिरिक्त पाणीसाठा असेल, तर तो पाईपलाईनद्वारे दुसऱ्या ठिकाणच्या धरणात नेला जाईल. उदा. जायकवाडीतील पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यातून सोडलं जातं. त्याऐवजी ते इतर धरणात सोडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो.
- भविष्यात उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला कृष्णा खोऱ्यातून पाणी देणे प्रस्तावित आहे.
- मुख्य पाईपलाईनपासून जलशुद्धिकरणाची प्रक्रिया करुन तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी दुय्यम पाईप लाईन प्रस्तावित आहे.
- प्रस्तावित दुय्यम पाईपलाईनद्वारे 20 किलोमीटर परीघातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
- स्थानिक स्वराज्य संस्थांना ठोक स्वरुपात दुय्यम पाईप लाईनद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येईल.
योजनेची सद्यस्थिती
मराठवाड्यातील 10 प्राथमिक संकलन अहवालापैकी 8 जिल्ह्यांसाठी 8 प्राथमिक संकलन अहवाल, तसेच मराठवाड्याकडे इतर खोऱ्यातून पाणी आणण्यासाठी 2 प्राथमिक संकलन अहवाल प्रस्तावित आहेत. त्यापैकी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यासाठी 2 पीडीआर मेकोरोटकडून प्राप्त झाले आहेत.
सिटीकट्टाची भूमिका
मराठवाड्याच्या हितासाठी असलेल्या प्रकल्पासाठीच व्यावहारिकतेची आडकाठी का?
मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटत असेल तर हा प्रकल्प व्यवहारिक नसला तरी केला पाहिजे. ४ वर्षांपूर्वी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला होता, भविष्यात तशी वेळ कोणत्याच शहरावर येऊ नये याकरिता पाणी वितरण व्यवस्था मजबूत करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे हा प्रकल्प विना विलंब सुरु केला पाहिजे. मराठवाड्याच्या हितासाठी असलेल्या प्रकल्पासाठीच व्यावहारिकतेची आडकाठी का?
GIPHY App Key not set. Please check settings