मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. इस्राईलच्या मदतीने राज्य सरकार मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी तब्बल 25 हजार कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. या माध्यमातून मराठवाड्यातील 11 मोठी धरणे एकमेकांना पाईपलाईनद्वारे जोडण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी इस्राईलमधील कंपनीने वर्षभर पाहणी केली. याचा अहवाल आज कंपनीने राज्य सरकारला सादर केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने पहिल्या टप्प्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा निधीही या प्रकल्पासाठी मंजूर केला आहे.
मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे. मराठवाड्यातील पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. तसेच मराठवाड्यातील दुष्काळ भूतकाळ असेल, असे मुख्यमंत्र्यांनी लासुर येथे बोलतांना सांगितले.
ही 11 धरणे पाईपलाईनने जोडणार
-
- जायकवाडी (औरंगाबाद)
- येलदरी (परभणी)
- सिद्धेश्वर (हिंगोली)
- माजलगाव (बीड)
- मांजरा (बीड)
- ऊर्ध्व पैनगंगा (यवतमाळ)
- निम्न तेरणा (उस्मानाबाद)
- निम्न मण्यार (नांदेड)
- विष्णूपुरी (नांदेड)
- निम्न दुधना (परभणी)
- सिना कोळेगाव (उस्मानाबाद)
GIPHY App Key not set. Please check settings