मागच्या वर्षात आणि या वर्षाच्या सुरुवातीला शहरातील आरोग्य धोक्यात येईल असे समाजाच्या सर्व स्तरावर स्तरातून, सोशल मीडियातून, वृत्तपत्रातून दूरचित्रवाणी तून सतत भडिमार होत होता .शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते .त्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न आणि बोंब – अशा दोन्ही गोष्टी सतत सुरू होत्या गेल्या काही महिन्यांपासून रोज सकाळी ठराविक वेळेला “”आमचा कचरा हो आणि आमची जबाबदारी,…..” अशी धून ऐकायला मिळते आणि त्यातून घराघरातून दिवसभरातला कचरा ओला आणि सुका वेगवेगळे करून महानगरपालिकेच्या गडीमध्ये टाकले जातात. घर स्वच्छ होते. याचप्रमाणे गाडीची डिकी खिशातले कागद, घरातल्या अडगळीचे सामान आवरल्यानंतर टापटीप,घर स्वच्छ दिसते. त्यातून एक वेगळ्या प्रकारचा समाधान आणि आनंद मिळतो हे कचऱ्याचे व्यवस्थापन अत्यंत नियोजन बद्ध होताना दिसते .
दररोज आपण कोणाशी तरी संभाषण करत असतो कुठल्यातरी घटनेला सामोरे जात असतो समस्या असतात त्यावर आपण मात करत असतो त्यातील अप्रियघटना आणि अप्रियसंभाषण बरेच वेळेला वर्षानुवर्षे आपण सांभाळत असतो यातून# माइंड फुल# होत असते म्हणजेच डोक्यातल्या मेंदूकडे असंख्य भूतकाळातला कचरा जमा होत असतो. त्यात माझा अपमान आणि मला नुकसान झाला असेल तर वर्षानुवर्षे हा कचरा सांभाळला जातो दररोज त्याला बघितलं जातं त्याची आठवण काढली जाते पण त्याचा निचरा जाणून बुजून आपण करत नाही. जसं घरातला कचरा आपण वेगळा करतो तसाच डोक्यातील कचराही वेगळा करता येतो, वेळोवेळी या कचऱ्याचा निचरा केलास माइंड फुल अनुभव येतो मोकळी जागा तयार होते हलकं आणि आनंदी वाटायला लागतं यातून मन आणि मेंदू यातही ही मोकळी जागा झाल्याची भावना निर्माण व्हायला सुरुवात होत असते.
आपल्याला इतरांसाठी काहीतरी दिल्यानंतर जो आनंद मिळतो तशी सवय लागत जाते आणि आपल्याकडून सकारात्मक दृष्टीने बघण्यास सुरुवात होते.नकारात्मक अनुभव नको असलेल्या गोष्टी मनात दाबून ठेवण्यापेक्षा त्याच जागी लगेच त्याचा निचरा केल्यास *माइंड फुल* चा अनुभव येतो नको असलेल्या संभाषण आणि घटना त्या स्वीकारणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं त्याचा धिक्कार आणि मला ते नकोच असा विचार केल्यास ते जास्त घट्ट मेंदूच्या मनाच्या तळाशी जाऊन बसतात याचा परिणाम ते कोणत्याही वेळी विचारात येतात आणि अस्वस्थ करत असतात सतत ते पोखरत राहत असतात
यासाठी टाळता न येणारा संभाषण अप्रिय संभाषण जर सतत आठवत असेल तर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करता ते शांतपणे त्याच्याकडे आपण पाहायला शिकले पाहिजे त्यातलं उत्तर शोधण्याची गरज आहे वेळीच त्याचा निचरा करणे आवश्यक आहे
स्वतःची संवाद साधून कागदावर लिहून जवळचे व्यक्तीशी बोलून ते शेअर केल्यास निचरा होण्यास मदत होते त्यातल्या वास्तविक गोष्टी मध्ये मी काय करू शकतो यावर काम करणे माझ्या हातात काय आहे याचाच विचार करणे हे महत्त्वाचे ठरते
डॉ संदीप सिसोदे
मानसोपचार तज्ञ
अध्यक्ष ,स्टेट सायकॉलॉजीस्ट असोसिएशन औरंगाबाद
9890054518
GIPHY App Key not set. Please check settings