प्रकल्पाबाबत केलेल्या घोषणात कोणत्याही स्वरुपाची कपात अधिका-यांनी स्वतःहुन करु नये: नितीन गडकरी

जालना रोड, बीड बायपास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी घेतली केंद्रीय वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांची भेट: लवकरात लवकर शहराच्या रस्त्यांचे काम पुर्ण करु, असे आश्वासन भूपृष्ठ वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. तसेच अधिका-यांनी प्रकल्पाबाबत केलेल्या घोषणात कोणत्याही स्वरुपाची कपात स्वतःहुन करु नये:; नितीन गडकरी यांची NHAI अधिकार्यांना सूचना.

0
523

औरंगाबाद शहरातील जालना रोड (जुना नॅशनल हायवे क्र.२११) येथील पुल आणि बीड बायपाससाठी नितीन गडकरी यांनी त्यांच्या सभेत केलेल्या नॅशनल हायवेच्या विकास कामासंदर्भात शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे व शिवसेना नेते खासदार आनंद आडसुळ यांनी नितिन गडकरी यांची भेट घेतली.

औरंगाबाद शहराचा विकास खासदार खैरे यांच्या मार्फत झपाटयाने होत आहे. औरंगाबाद शहर हे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी मराठवाडयाचे विभागीय शहर असुन, त्याचा विकास पाहिजे त्या प्रमाणात होत नसुन, धिम्या गतीने होत आहे. जागतिक ऐतिहासिक वारसा शहराला लाभला असुन पाहिजे तेवढया सुविधा अत्यल्प प्रमाणात मिळत आहे. या संदर्भातच नॅशनल क्र.२११ हा येणा-या काळातील डिएमआसी साठी फार उपयुक्त असुन, त्या करीता लागणा-या पायाभुत सुविधा याची अंमलबजावणी करण्यात यावी.


(एकही घोषणा पूर्ण झाली नाही तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे. मी खोटे आश्वासन कधी देत नाही. देशात काम करण्याकरिता पैश्याची कमी नाही इछाशक्तीची कमी आहे. अशी घोषणा नितीन गडकरी यांनी २५ डिसेंबर २०१५ रोजी औरंगाबादेत केली होती.)

नितिन गडकरी यांनी २५/१२/२०१५ च्या सभेत केलेल्या घोषणेनुसार जालना रोड चे (जुना नॅशनल हायवे क्र.२११) सहा पदरीकरण जे नगरनाका ते कॅम्ब्रीज हायस्कुल चिकलठाणा रोड आणि बीड बायपासचे झाल्टा फाटा ते महानुभव चौक यात जोडणारे दोन पुल मुकुंदवाडी व देवळाई ज्याची किंमत ७५० कोटी हे काम एनएचएआयच्या वार्षिक आराखडा त केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्रालय आदेशान्वीत केले आहे. शहरवासीयांना या विकास कामाबद्दल फार उत्सुकता आहे. या संदर्भात गडकरी यांनी केलेल्या घोषणेनुसार शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी  त्यांच्या दालनात एनएचएआय औरंगाबाद येथील अधिका-यांची बैठक घेतली व कामाचे स्वरुप गडकरी यांना सांगितले.

        (खासदार खैरे यांनी आज नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना औरंगाबादमध्ये केलेल्या घोषणांची आठवण करून दिली.)

या वर नितिन गडकरी यांनी एनएचएआयचे अध्यक्ष दिपक कुमार यांना ज्या घोषणा केल्या जातात त्यात अधिका-यांनी कोणत्याही स्वरुपाची कपात स्वतःहुन करु नये अशा सुचना दिल्या. आणि शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे व शिवसेना नेते खासदार आनंद आडसुळ यांना लवकरात लवकर शहराच्या विकासाचे काम पुर्ण करु असे आश्वासन दिले.

Previous articleमालमत्ता करासाठी अभय योजना : मूळ रक्कम भरा; व्याज, दंडात 75% सूट
Next articleऔरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न कृतीबध्द कार्यक्रमानुसार मार्गी लावा- मुख्य सचिवांचे निर्देश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here