औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेच्या आधिवेशनात आपल्या पहिल्या भाषणात औरंगाबादच्या पर्यटन आणि उद्योगवाढीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे साकडे घातले. पंतप्रधान मोदींनी देशातील पर्यटन विकासाला औरंगाबादेतून सुरुवात करावी, अशी विनंती जलील यांनी केली. जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ येथील लेणी पाहण्यासाठी जगभरातून औरंगाबादमध्ये पर्यटक येतात, मात्र जेट विमानसेवा बंद झाल्यानंतर पर्यटन आणि ओद्योगिक परिणाम झाला असल्याचे सांगितले.
पर्यटन आणि पायाभूत सुविधा या गोष्टींचे महत्व अधोरेकित करतांना मोदी म्हणाले की ते देशाच्या आर्थिक समृद्धीसाठी आणि मेक इन इंडिया आणि कौशल्य विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे.
कधीकाळी औरंगाबाद उदयपूर-जयपूर-दिल्लीला जोडणारी विमानसेवा शहरातून सुरू होती. त्यामुळे जगभरातील पर्यटक इथे यायचे. अजिंठा, वेरूळ लेण्यांसह शहरातील विविध पर्यटन स्थळांनी भेटी देऊन मुक्काम करायचे. पण कालांतराने ही सेवा बंद झाली आणि पर्यटन व्यवसायाला घरघर लागली. गेल्या काही वर्षात जेट एअरवेजसह काही कंपन्यांची सेवा बंद झाल्यानंतर त्याचा फटका औरंगाबादला बसला आहे. जेटची औरंगाबादहून दिल्ली आणि मुंबईला जाणारी दोन विमाने रद्द झाल्यामुळे जगभरातून येणाऱ्या पर्यटक तसेच उद्योजकांची मोठी गैरसोय होत आहे, असे औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी मांडून या प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधले.
मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. औंरगाबाद वगळता इतर जिल्ह्यांमध्ये उद्योगांचे प्रमाण नगण्य आहे. अशावेळी व्यवसाय व उद्योगांचे महत्व लक्षात घेऊन नागरी उड्डयण विभागाने तातडीने खाजगी किंवा एअर इंडियाच्या दिल्ली-मुंबई विमानसेवा सुरू कराव्यात अशी मागणी इम्तियाज जलील यांनी सभागृहात केली.
नवीन विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात पर्यटन क्षेत्रातील संघटना, औद्योगिक संघटनानी नागरी उड्डयण मंत्री, सचिव आणि विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना निवेदन दिले आहेत. या संदर्भात ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली आहे, आणि त्याला येथील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद भेटला होता. खासदारांनी मांडलेल्या मुद्यानंतर सरकार याविषयी गांभीर्याने विचार करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
GIPHY App Key not set. Please check settings