23.1 C
Aurangabad
Home Blog Page 3

आज दिवसभरात 93 रुग्णांची वाढ; औरंगाबादमध्ये आतापर्यंत एकूण 842 कोरोनाबाधित

0

औरंगाबाद जिल्ह्यात आज 93 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 842 झाली, असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एन सहा,सिडको (2), बुढीलेन (1), रोशन गेट (2), संजय नगर (1), सादात नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), वसुंधरा कॉलनी (1), वृंदावन कॉलनी (3), न्याय नगर (8), कैलास नगर (1), पुंडलिक नगर (8),सिल्क मील कॉलनी (7), हिमायत नगर (6), चाऊस कॉलनी (3), भवानी नगर (4), जुना मोंढा, भवानी नगर (1), रेहमानिया कॉलनी (4) हुसेन कॉलनी (19), प्रकाश नगर (1) शिव कॉलनी गल्ली नं. 5, पुंडलिक नगर (1), हुसेन कॉलनी, गल्ली नं. 5 (2), बायजीपुरा (7), हनुमान नगर (1), हुसेन नगर (1), अमर सोसायटी (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.1, दुर्गा माता मंदिर (1), फुलशिवरा गंगापूर (2), बहादूरपुरा (1), रऊफ कॉलनी (1), या भागातील कोरोनाबाधित असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

१४ दिवस क्वारंटाइनचे ..

0

कोरोनाच्या थैमानाने सगळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पोलीस दलाला संचारबंदीसह सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्याचे मोठे आवाहन लॉक डाऊन काळात आहे. अवैध धंदा करणाऱ्या एकाला अटक करून पोलीस ठाण्यात आणले असता, तो कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने पोलीस ठाण्यात खळबळ उडाली; अशीच एक घटना नुकती शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यामुळे बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्ट कराव्या लागल्या. सुदैवाने सर्वांच्याच टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले. परंतु त्यांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला. १४ दिवस क्वारंटाइनचे कसे निघाले याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेली आपबीती.

संचार बंदीमुळे हद्दीत पेट्रोलिंग सुरु असताना खबऱ्या मार्फत बातमी मिळाली कि, पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम नशेच्या गोळ्यांची विक्री करत आहे. याबाबत माहिती वरिष्ठांना देऊन पथक त्याला अटक करण्यासाठी रवाना झाले. ठरल्याप्रमाणे सापळा रचण्यात आला त्याला त्याच्या एका साथीदारासोबत अटक देखील करण्यात आली. काही दिवस पोलीस कोठडीत असल्यामुळे त्यांच्याशी निकटचा संपर्क आलाच होता. तुरुंगात ठेवण्याआधी मेडिकल टेस्ट करावी लागते म्हणून त्याला मेडिकलसाठी पाठवण्यात आले. सध्याचे वातावरण पाहता आरोपीची कोरोना टेस्ट देखील करण्यात आली. अटक केल्या पासूनच सुरक्षितता बाळगण्यात आली. त्यानंतर एका आरोपीचा अहवाल पोसिटिव्ह आल्याने मनात एकच धास्ती उडाली. कि, आता घरी कसा जाऊ, घरच्यांना काय आणि कसे सांगू इतर वेळी वेगळ्या घडलेल्या घटना या सर्वांची वाच्यता घरच्यांशी करताना कधीच दडपण नाही आले. परंतु हि बाब कशी सांगावी या साठी हिम्मत होत नव्हती. नुकताच मुलाचा वाढदिवस झाल्याने घरातले वातावरण लॉकडाऊनच्या ताणातून थोडे प्रफुल्लीत झाले होते. त्यातच हे सर्व घडल्याने थोड्यावेळ मन सुन्न झाले. त्यातच निरोप आला कि उद्या खबरदारी म्हणून कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे थोडा वेळ गांगरून गेल्यासारखे झाले. हिम्मत करत घरी पोहचून नित्याप्रमाणे वर्दी गरम पाण्यात घराबाहेर भिजवली, बुटासह संपूर्ण शरीर सायनेटायझरने निर्जंतुक केले. अंघोळ करून बाहेर पडल्यावर अचानक मुले समोर आली, त्यांच्या जवळ जायची हिंमत होत नव्हती; घरच्यांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. पोलीस असल्यामुळे या गोष्टीला तोंड द्यावे लागेल असे सांगून घरच्यांनी वेगळी सकारात्मक हिंमत दिली. दुसऱ्या दिवशी उठून आवरून टेस्ट करण्यासाठी जावे लागले. टेस्ट झाली, अहवाल देखील निगेटिव्ह आला, मनातली एक मोठी धास्तीच निघून गेली परंतु डॉक्टरांनी १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला.

दवाखान्यातूनच घरी होम क्वारंटाइन म्हणजे काय करावयाच्या सुचना देण्यात आल्या, त्याची संपूर्ण माहिती घरी कळवली. घरच्यांनी बाहेरील खोली अलगीकरणासाठी तयार केली. घरातच कुटुंबासोबत राहून कुटुंबा जवळ राहता येत नाही. या प्रकारच्या यातनांनी सुरुवातीचे दोन – तीन दिवस मन सुन्न होऊन विचित्र विचारांनी रात्रीची झोप जड झाली. खोलीच्या दारातच जेवणाचे ताट, पिण्याचे पाणी जेवण झाल्यावर ताट स्वतः स्वच्छ धुणे त्यानंतर घरच्यांकडून त्याच्यावर सॅनिटायझरने निर्जंतुक करून घेणे हा रोजच्या दिनचर्येचा भाग झाला. सोशल मिडिया वरून रोज घडणाऱ्या घटनांचा आढावा घेत दिवस कसा बसा जाऊ लागला. पोलीस दलात कार्यरत असल्यामुळे रोज वेगवेगळ्या माणसात वावरण्याची सवय, परंतु अचानक अलगीकरणात रहाव लागल्याने दिवसा कोणी बोलायला नसल्याने मन कावरे बावरे होऊ लागले. पोलीस ठाण्यातील सहकारी सोशल मिडया वर चर्चा करू लागलो. विविध कारवाया, शहराच्या शांततेसाठी तसेच पोलीस ठाण्यातील विविध कामासाठी सोशल मिडीयाच्या ग्रुपचा वापर करावा लागायचा तोच बहुतांश सहकारी अलगीकरणात असल्यामुळे त्या ग्रुपवर चर्चेचे विषय बदलून, जेवण झाले का ? घरच्यांपासून दूर आहेत ना ? काळजी घेण्याचे सल्ले, थोडीफार कार्माच्यार्यांची मस्करी यात दिवस निघून जाऊ लागले. कॉलेजच्या वयापासून वाचनाची आवड होती परंतु कर्तव्यामुळे वाचनाच्या आवडीला पूर्ण विराम लागला होता. या काळात चार वर्षापूर्वी अपूर्ण राहिलेल्या एका कादंबरीसह तीन कादंबरी १४ दिवसात वाचून काढल्या. क्वारंटाइन म्हणजे नेमके काय याची पूर्ण माहिती गावाकडील आप्तेष्टांना नव्हती, अनेकांनी घाबरून कॉल केले. १० वर्ष जुने मित्र ज्यांचा अक्षरशः संपर्क तुटला होता, त्याचे कॉल आल्याने मनाला वेगळे समाधान मिळाले. १४ दिवस झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन कर्तव्यावर हजर होतांना एखाद्या पक्षाला पिंजऱ्यातून मुक्त केल्यावर तो जशी गगन भरारी घेतो, तशीच प्रचीती १४ दिवसांनंतर वर्दी घातल्यावर झाली. सध्याचा काळ फार नाजूक आहे, नागरिकांनी स्वतःची, कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. १४ दिवस क्वारंटाइनचे हा अनुभव आज देखील अंगावर काटा आणतो. घरातील स्वच्छता, सोशल डीस्टनसिंग या महत्वाच्या बाबीचा अवलंब करण्याची गरज सध्या आहे.

जिल्ह्यात एकूण 823 कोरोनाबाधित, आज 74 रुग्णांची वाढ

0

शहरात आज 74 कोरोनाबाधितांची वाढ झाली. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 824 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एन सहा,सिडको (2), बुढीलेन (1), रोशन गेट (1), संजय नगर (1), सादात नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), वसुंधरा कॉलनी (1), वृंदावन कॉलनी (3), न्याय नगर (7), कैलास नगर (1), पुंडलिक नगर (8),सिल्क मील कॉलनी (6), हिमायत नगर (5), चाऊस कॉलनी (1), भवानी नगर (4), हुसेन कॉलनी (15), प्रकाश नगर (1) शिव कॉलनी गल्ली नं. 5, पुंडलिक नगर (1), हुसेन कॉलनी, गल्ली नं. 5 (2), रहेमानिया कॉलनी (2), बायजीपुरा (5), हनुमान नगर (1), हुसेन नगर (1), अमर सोसायटी (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.1, दुर्गा माता मंदिर (1) या भागातील कोरोनाबाधित असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

औरंगाबाद 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ; एकूण बाधीतांची संख्या 742

0

#CoronaUpdate | 14 मे सकाळी 9 वाजता
औरंगाबाद 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ; एकूण बाधीतांची संख्या 742
आतापर्यंत 210 रुग्ण बरे झाले असून तर 19 रुग्णाचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

भीमनगर (भावसिंग पुरा) १५, शिवपुरी (पाडेगाव) १, उस्मानपुरा ७, सिल्क मिल्क कॉलनी १, कांचनवडी १, नारळी बाग १, RTO ऑफिस २, गरम पणी १, बन्सीलाल नगर १, सातारा परिसर ७, खंडोबा मंदिर परिसर १, संजय नगर ३, हुसेन कॉलनी २, दत्तनगर (गल्ली क्रमांक ५) मधील १, न्याय नगर २, पुंडलिकनगर १, गुरूनगर १, बेगमपुरा १, पंचशील दरवाजा १, शहानूर वाडी १, गारखेडा १, नंदनवन कॉलनी १ आणि अन्य २

Malik Ambar; The Architect of Aurangabad

0

Malik Ambar The Architect of Aurangabad
A pretty hamlet called ‘Khirki'(now Aurangabad) was totally transformed by Malik Ambar who revived the Nizam Shahi dynasty of Ahmednagar and transferred his military base to Aurangabad which he named after his son as ‘Fatehnagar’ or ‘Fatehabad’. In the very early period he built a palace for the Sultan known as Green Bungalow and a Mansion for himself close to the royal market (Shahgunj). To form a large centre of population in a dry soil like this, the first thing necessary was water. So he constructed a big tank close to the town and also brought water Tourism Products in Aurangabad to his own house by means of a canal from the river near Harsul. The town was about four miles round and the village grew up on its side.

Water System
The most significant contribution of Malik Ambar to city was a carefully planned water system, which was primarily responsible for the town’s development and popularity. A hillock overlooking the city near Arsul (Harsul) was selected to cut twelve square miles of rock and dug for storing rain water. The depth from ground level is 42 ft.length-9400 ft 3 ft. and height 6 to 10 ft. Brick arches resting on natural rock serve as ceiling. At regular intervals of 200 to 300 ft. apertures are fabricated for men to alight inside. A hollow socket served as a water gate and was known as Charbumba which was fitted into small twelve inch diameter cavities from where through underground nehars water ran into a well, popularly known as Gai Mukh.. located today near Azad College Guest House.

From Kato Lak through underground earthen pipes the water reaches Delhi Gate and Sahgunj and through a network of pipes it is supplied to major parts of the city. The principle courses are fourteen in number. The eastern branch supplies the portion of the city about Shahgunj and the northern-western called Photi Naher passes by the Bhadkal Gate to the Nawkhanda Palace, Juna Bazar, Chowk and Gulmandi. This system of water supply was known as “Nehare Ambari” in which rain water was accumulated, filtered and supplied to the city. This water system was the first of its kind and the last to be created in the entire country.
A purely native interpretation, applying only indigenous material and workers, an exclusive example requiring elementary engineering technique of water supply from a higher to a lower level, unsophisticated unpretentious, economical and immutable. Today these conduits are vitreous and brittle and only one fourth of the former quantity of water reaches the city.

( Extract from the Book’ Tourism Potential of Aurangabad’ written by Prof Dulari Qureshi)

 

पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सिपेटला दिली भेट; खबरदारीचा उपाय म्हणून कोविड रुग्णालय उभारणार

0

उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज सकाळी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील सिपेट (केंद्रीय प्लास्टिक आणि अभियांत्रिकी संस्था) इमारतीस भेट देऊन पाहणी केली.

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने भविष्यातील आरोग्य सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या इमारतीची संभाव्यता लक्षात घेऊन, खबरदारीचा उपाय म्हणून या भागात कोविड रुग्णालय उभारले जाणार आहे म्हणून या इमारतीची पाहणी आज श्री. देसाई यांनी केली. १०००० चौरसमीटर क्षेत्रफळात असलेल्या या इमारतीत 250 बेड्सचे रुग्णालय उभारले जाणार आहे. या इमारतीत असलेल्या सोयी  सुविधांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी श्री.देसाई यांना दिली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार चंद्रकांत खैरे, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, मनपाच्या जिल्हा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर आदींची उपस्थिती होती.

पॅरासाईटांचा समाज

0

जीस रेल से जा न सके,
मर के उसी मे सवार थें हम
याद रखना ए दुनियावालो
तुम्हारे घर की निव रखनेवाले
मजदूर थे हम….

गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार हा पॅरासाईट या चित्रपटाला मिळाला आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली की पॅरासाईट म्हणजे कोण? अनेकांना याचं उत्तर सापडलं नाही, किंवा शोधलं नाही किंवा ते समजलं नाही. पण कोरोनाचा आऊटब्रेक, त्यामुळे होणारा लॉकडाऊन आणि त्यानंतर औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून 16 मजुरांचे गेलेले प्राण इथपर्यंत आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता यावं लागनं ही खरं तर आपल्या संपत जाणाऱ्या संवेदनशीलतेचे उदाहरणच म्हणावे लागेल. खरं म्हणजे उत्तर एवढं कठीण नव्हतं, आपल्या समोरच होतं.

पॅरासाईट कोण असतं ?
पॅरासाईट ती व्यक्ती किंवा तो प्राणी असतो जो दुसऱ्यांच्या रक्तावर जगतो. त्यांचं शोषण करतो. ही झाली त्याची व्याख्या. म्हणजे जी व्यक्ती जिवंत राहण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून असते, त्याच्याकडून काहीतरी घेतल्याशिवाय तिला जगता येत नाही तिला पॅरासाईट म्हणता येईल. प्रत्यक्षदर्शी कामगारवर्ग, मजूर , गरीब लोक पॅरासाईट आहेत असं वाटतं. करण मोठमोठ्या कंपन्यांच्या मालकांच्या दयेवर, त्यांच्या पैशावर ते जगतात. या उद्योगपतींनी जर त्यांना रोजगार दिला नाही, पैसे दिले नाहीत तर कदाचित हे गरीब मरतील म्हणून ते पॅरासाईट..बॉन जून हो च्या पॅरासाईट या सिनेमातसुद्धा गरीब किम कुटूंब अति श्रीमंत पार्क कुटुंबावर रोजगार, पैशांसाठी अवलंबून असतं अर्थात पॅरासाईट असतं.वरकरणी!

पण दिग्दर्शकाने चित्रपटात दाखविल्याप्रमाणे प्रत्यक्ष जीवनात सुद्धा या प्रश्नाला एका मोठ्ठया कॅनव्हासवर पाहण्याची गरज भासते आणि तेव्हा लक्षात येतं की खरा पॅरासाईट कुणीतरी वेगळंच आहे. खऱ्या अर्थाने पॅरासाईट आहेत उद्योगपती, अति श्रीमंत, उच्च मध्यमवर्ग, आणि संवेदना संपत असलेला नवा पांढरपेशी मध्यमवर्ग.
श्रमिकांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळतो. पण तो खरंच त्याच्या श्रमाचा योग्य मोबदला असतो का? तो मोबदला त्याचं आणि त्याच्या कुटुंबियांचं जीवनमान उंचावण्यासाठी पुरेसा असतो का? नाही. खरं म्हणजे हा मोबदला त्याच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी सुध्दा पुरेसा नसतो. म्हणजे त्याच्या मोबदल्यात कुचराई करून कुणाचे खिसे भरले जातात तर ते या अति श्रीमंत लोकांचे, उद्योगपतींचे. इकडे मजूर त्यांचं भाग्य पायदळी तुडवत असतांना कोरोना नंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लगेच उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश आदी राज्यांनी कामगार कायद्यात बदल केले. आता कामाचे तास 12, ओव्हर टाईम वाढ, कामगारांच्या आरोग्य विम्यात शिथिलता असे अनेक बदल होत आहेत ज्यामुळे आपला कामगार खऱ्या अर्थाने रिसोर्स बनणार आहे मशीन आणि इतर संसाधनांसारखा. म्हणजे उद्योगांना आकर्षित करायचं असेल तर त्यांचा खर्च कमी करायला हवा नफा वाढवायला हवा. तो कसा वाढेल? तर कामगारांकडून कमी मोबदल्यात अधिक काम करवून. अति श्रीमंत त्यांच्या राहणीमानात इंचभर बदल घडवणार नाही पण हातावर पोट असणाऱ्या मजुरांना अधिक गरीब नक्की बनवतील. म्हणजे या उच्चभ्रू लोकांची चैन या कामगार वर्गाच्या, श्रमिकांच्या शोषणावर अवलंबून आहे. या श्रमिकांच्या रक्त आणि भावनांच्या शोषणावर हे उच्चभ्रू जगत आहेत त्यामुळे तेच खऱ्या अर्थाने पॅरासाईट आहेत.

श्रमिक हा कधीच पॅरासाईट नसतो. तो श्रम विकतो पण त्याचा योग्य मोबदला त्याला दिला जात नाही. तो स्वावलंबी असतो. दुसऱ्यांच्या हक्काची रोटी तो पळवत नाही. त्याला कामाच्या ठिकाणी अनेकदा आरोग्याच्या सुविधा दिल्या जात नाही. त्याच्या आयुष्याची सिक्युरिटी नसते. त्याला कधीही कामावरून काढून टाकले जाते. त्याला अपघात झाला तर काय? असे हजारो प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभे असतात. म्हणूनच आपल्याकडे हा अति गरीब वर्ग कधीच वर येत नाही, आणि कधी आलाच तर मध्यम वर्गात येण्याची त्याची ही कसरत अत्यंत जीवघेणी असते. पॅरासाईट या चित्रपटात किम कुटुंब आणि जुनी कामवाली यांच्यातील संघर्ष ही कसरत दाखवतो. हा संघर्ष त्यांना अधिक खाली, अंधारात घेऊन जातो.

त्यामुळेच जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा आधी संसाधन असलेले मजूर एकाएकी मालकांसाठी पॅरासाईट बनले. अशा मालकांनी त्यांच्यावर कृपा न दाखवता त्यांना तसच सोडून दिलं. म्हणजे व्हाईट कॉलर लोकांमुळे आपल्याकडे आलेला हा आजार, विमानांनी उडणाऱ्या लोकांनी आपल्या देशात आणला आणि त्याचा सगळ्यात पहिला आणि मोठा फटका या गरीब लोकांना बसला. आता हे मजूर लॉकडाउन मुळे पुन्हा बेरोजगार झाले, बेघर झाले, यांना परत आपल्या घरी जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. हे लोकं हजारो मैल पायीच चालू लागले, आणि घराच्या दिशेने सुरू झालेली ही वारी जीवघेणी ठरली. ज्या रेल्वेचे तिकीट मिळाले नाही त्या रेल्वेमधून त्यांचे शव वापस गेले. अशावेळी या कामगारांसाठी दिलासादायक काहीतरी शासनाने करायला हवं होतं. कोरोना आटोक्यात आल्यानंतर त्यांना पुन्हा उद्योगांकडे आकर्षित करण्यासाठी काहीतरी करणं अपेक्षित आहे पण तसं न करता उलट त्यांच्यावरच नव्याने शोषण करणारे बदल कामगार कायद्यात घडवण्यात आले. ज्या दळभद्री लोकांना दोन वेळ जेवण्याची शाश्वती नाही त्यांच्यावर अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा भार टाकण्यात आला. कारण राज्यकर्त्याना माहीत आहे पोटाची आग तडजोड करायला भाग पाडते. त्यामुळे पुन्हा या मजदूरांना शोषणाची ही व्यवस्था स्वीकारावी लागणारच. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असा हा प्रकार आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेला पुन्हा सुरळीत करण्यासाठी श्रमिकांचं शोषण अपरिहार्य आहेच. त्यामुळे कोरोनानंतरची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं पॅरासाईट ठरण्याची भीती नाकारता येणार नाही.

पण खरा धोका आहे तो असंवेदनशील होत चाललेल्या मध्यम वर्गाच्या मानसिकतेचा.आपण सगळे फक्त पॅरासाईटच नाहीत तर असंवेदनशील सुद्धा होत आहोत. ही वृत्ती वेळीच थांबायला हवी. पॅरासाईट बनणं हा रोग आहे जो एका असंवेदनशील वृत्तीसोबत येतो. आपण कोणाचं किती रक्त शोषतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीचे किती हाल होतात याकडे आपलं लक्षच राहत नाही. केवळ माझा फायदा हा एकमेव मंत्र हे पॅरासाईट सतत जपत असतात.

संत ज्ञानेश्वर म्हणतात, “अवघाची संसार सुखाचा करेन”. पण आपण काही वेगळं तर म्हणत नाही आहोत ना याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या सर्व व्हाईटकॉलर लोकांनी स्वतःमध्ये माणुसकी आणण्याची आणि स्वतःला पॅरासाईट होण्यापासून थांबवण्याची गरज आहे. – अनामिका

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – आरोग्य मंत्री राजेश टोपे

0

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार पसरू नये यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वसमावेशक ‘टास्क फोर्स’ची स्थापणा करुन सुक्ष्म नियोजनाव्दारे रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवावे. जिल्ह्यातील प्रशासन समन्वयाने काम करत असून प्रशासनाच्या या कामात लोकप्रतिनिधी , सामाजिक कार्येकर्ते आणि सामान्य जनता यांचे सहकार्य दखील तितकेच महत्वाचे आहे. जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलिस प्रशासन, आरोगय विभाग जोमाने काम करत असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनी यांच्यासमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, इम्तियाज जलील, आमदार सर्वश्री अंबादास दानवे, सतीष चव्हाण, हरीभाऊ बागडे, अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलिस अघीक्षक मोक्षदा पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. कुलकर्णी, आदी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन बैठक पार पडली.
बैठकीच्या सुरूवातीला खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील परिस्थितीची माहिती आरोग्यमंत्र्यांना दिली. घाटीमध्ये केवळ कोविड बाधित रुग्णांवरच उपचार करण्यात यावेत तसेच जिल्ह्यातील खाजगी लॅबला तपासणीसाठी परवानगी देण्यात यावी असे त्यांनी मत मांडले.

डॉ. भागवत कराड यांनी शहरातील वाढता प्रादुर्भाव पाहता बाधित क्षेत्रासह इतर भागातही संचारबंदी कडक करावी अशा सूचना देत राजस्थानमधील भिलवाडा पॅटर्न आपल्या जिल्ह्यात राबवावा जेणेकरुन कारोना रुग्णांची संख्या कमी होईल असेही ते म्हणाले.

आमदार हरीभाऊ बागडे आपले मत मांडताना म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी सुध्दा लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करुन प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. संचारबंदीच्या काळात नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असेही हरीभाऊ बागडे म्हणाले.

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी विभागात करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, शहरातील अनेक कन्टेंनमेन्ट भागाला मी स्वत: भेटी दिल्या असून तेथील नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती करुन घेऊन तशा प्रकारच्या उपाययोजनांवर भर देण्यात येत असल्याचेही श्री केद्रेंकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी यांनी शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांची माहिती देताना सांगितले की, शहरात जास्तीत जास्त तपासणी करण्यावर प्रशासनाचा भर आहे जेणेकरुन रुग्णांवर उपचार करणे सोपे होणार आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा कसून शोध घेऊन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. तसेच कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांच्या चाचण्या घेण्याला प्राधान्य देण्यात आले असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांसोबत घेतला आरोग्यविषयक आढावा-


यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यात वाढत चाललेल्या रुगणसंख्या आणि त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांविषयी आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोविड बाधित गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र खाजगी रुग्णालयाची अथवा वार्डची निर्मिती करावी जेणेकरुन त्यांची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेता येईल. तसेच घाटीमध्ये केवळ कोविड बाधित रुग्णांवर उपचार करावेत नॉन कोविड रुगण खाजगी रुग्णालयात भरती करावेत जे खाजगी रुग्णालय रुग्ण भरती करुन घेण्यास टाळाटाळ करतील त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी. तसेच ज्या कोवीड बाधीत रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे नाहीत त्यांच्यावर आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार उपचार करण्याच्या सुचना देखील आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

कंटेन्मेंट भागातील नागरिकांशी साधला संवाद-


आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी किलेअर्क परिसरातील अलगीकरण केंद्राला भेट दिली. येथील रुग्णांशी त्यांनी संवाद साधून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. रुग्णांना नाष्टा, जेवण आणि इतर सोयी सुविधा वेळेवर मिळतात का याची विचारणा करताच सर्व रुग्णांनी ह्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर आरोग्यमंत्री किलेअर्क येथील कंटेन्मेंट भागात जाऊन तेथील नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. त्यानंतर जामा मशिद व्यवस्थापणाने 215 रुग्णांसाठी निर्माण करुन दिलेल्या व्यवस्थेविषयी आरोग्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी , विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, शहर अभियंता श्री पानझडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने ‘आपला वार्ड कोरोनामुक्त वार्ड अभियान’

0

महानगरपालिकेच्या वतीने शहरात 11 मे सोमवार ते 24 मे रविवार या कालावधीत ” आपला वार्ड कोरोनामुक्त वार्ड” हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात दररोज विविध प्रकारच्या अँक्टीव्हीटीज करावयाच्या असून त्याचे नियोजन घरीच बसून नागरिकांनी करावे यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन मनपाचे प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी केले आहे.

11 मे रोजी कोरोनाला हरवण्यासाठी सामूहिक शपथ घेणे, 12 मे जनजागृती गीत गायन दिवस, 13 मे दीप महोत्सव, 14 मे कोविड योध्दांचे अभिनंदन दिवस, 15 मे अँन्टी कोरोना पोलीस स्थापना दिवस, 16 मे स्वतः चा सन्मान दिवस, 17 मे माझे गुरू-माझे आदर्श दिवस, 18 मे समुह गायन दिवस, 19 मे निबंध, लेख, चित्र काढणे दिवस, 20 मे रंगोत्सव दिवस, 21 मे माझे आरोग्य माझे हाती, 22 मे मीच माझा रक्षक, 23 मे दो गज दुरी, 24 मे आनंदोत्सव दिवस साजरा करण्यात येणार आहे.

14 मे रोजी कोरोना विरुध्दच्या लढाईत आपण सर्वजण लढवय्ये शामिल आहेत. परंतु पोलीस विभाग, आरोग्य विभाग, महानगरपालिका, महसूल विभाग अहोरात्र सेवा देत आहेत. या कोव्हिड योध्दांचे करने आवश्यक आहे. या करीता डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफ, मनपा साफसफाई कर्मचारी, पोलीस, महसूल विभागाचे कर्मचारी यांच्या विषयी त्यांनी अहोरात्र दिलेल्या सेवेसाठी एक पान, 200 शब्दात पत्र लिहून ईमेलद्वारे अथवा फेसबुकवर पाठवणे, पत्र घरातील लहान मुलांनी स्वहस्ताक्षरात लिहलेले असावे.

हे पत्र Email ID, commissioner@aurangabadmahapalika.org
Facebook: https//www.facebook.com/comments.abdmahapalika/
Twitter:https//twitter.com/commissionerabd वर पाठवू शकतात.

17 मे रोजी माझे गुरु माझे आदर्श या विषयावर ज्यांना आपण आपल्या आयुष्यातील गुरु मानतात त्यांच्याबद्दल आठवणी 200 शब्दात लिहून काढणे. मनपाच्या ईमेल, फेसबुक, इस्टाग्रामवर अपलोड कराव्यात, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.