औरंगाबादमध्ये आवर्जून बघावे अशी काही पर्यटनस्थळे

0
294

ऐतिहासिक वारशाने समृद्ध अशी ही नगरी. कलाकुसर, इतिहास, संस्कृती असं देण लाभलेलं औरंगाबाद म्हणूनच महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून गौरवप्राप्त आहे. 52 दरवाजांचे शहर म्हणून परिचित या शहरातील ऐतिहासिक वैभव आजही मुग्ध करून टाकतात. मध्य हिंदुस्तानातील हे केंद्र सातवाहन, वाकाटाक आणि यादव या कालखंडातील आपले नाते सांगते. चौदाव्या शतकातील मुघल सल्तनीने एकेकाळी दिल्लीहून थेट देवगिरी किल्ल्याला आपली राजधानी हलवली. सोळाव्या शतकामध्ये निझामशाहीतील पंतप्रधान मलिक अंबरने औरंगाबादचा चेहरा मोहरा बदलून टाकला. एकंदरीत औरंगाबादमध्ये मिश्र संस्कृतीची झलक बघायला मिळते. सुफी आणि शास्त्रीय रागदारीचा संगम येथे आहे. कलेचा वारसा सांगणारी पैठणी, हिमरु कारागिरी, बिदरी सारखे नाजुक कलाकुसरीच्या नक्षीकामाची भांडी आणि वस्तुंचे हे माहेरघर. पैठण म्हणजेच पूर्वीचे प्रतिष्ठाणनगरी हे व्यापाऱ्यांचे मोठे केंद्र. संमिश्र संस्कृतीची झलक जशी वास्तु आणि कलेत दिसते, तशी ती पेहराव आणि खाद्यपदार्थांच्या वैविध्यातही दिसून येते. अजिंठा आणि वेरुळ लेण्यांच्या रुपाने युनेस्कोच्या यादीतील दोन जागतिक वारसास्थळे सुद्धा औरंगाबादमध्ये आहेत. त्यामुळे जगभरातून हा ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी वर्षभर गर्दी कायम बघायला मिळते.

2अजिंठा लेणी

Photo © Sreeji Nair

रंगीत भित्तीचित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या अजिंठ्यात एकूण 30 कोरीव लेण्या आहेत. या लेण्या इसवी पूर्वी 200 ते 650 दरम्यानच्या आहेत. बौद्धधर्मीय असलेल्या या लेण्यांत बौद्ध मंदिरे, गुफा, विहार आणि गौतम बुद्धांच्या जीवनावर कोरलेले अनेक प्रसंग रेखीव आहेत. 1819 साली ब्रिटीश अधिकारी जॉन स्मिथने या लेण्यांचा पुर्नशोध लावला. अजिंठा लेणीनजीक निसर्ग अनुभवयाचा असल्यास व्ह्यू पॉंईंट, अजिंठा किल्ला, पारोची कबर, घटत्कोच लेण्या आणि जंजाळा किल्ल्याला जरूर भेट द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here