श्री विनोद कुमार यादव, महाप्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे यांनी दिनांक ११ जानेवारी ला माननीय खासदार यांच्या बैठकीत कळविल्या प्रमाणे नांदेड विभागात रेल्वे विद्युतीकरणचे काम लवकरच सुरु होणार आहे .
या अंतर्गतच दिनांक १२ जानेवारी २०१८ ला नांदेड रेल्वे विभागात रेल्वे इलेक्टरीफिकेशनचा फूट बाय फूट सर्वेला सुरुवात झाली आहे.
या सर्वे मध्ये रेल्वे पूल, लेवल क्रॉसिंग्स, कर्व (वळण), सिग्नल, पॉईंट अँड क्रॉसिंग, इत्यादी विषयीची सविस्तर माहिती घेतली जाते जेणेकरून विद्युतीकरण कामास सुरुवात करता येईल.
सर्वे मध्ये प्रत्येकी ५ जणांच्या ४ टीम हे काम करत आहेत. यात मुदखेड ते पूर्णा हे जवळपास ७० किलिमीटर चे अंतर सर्वे पूर्ण केला गेला आहे. काम पूर्ण झाल्यावर मग या कामाचे टेंडर्स काढले जातील .
रेल्वे या सर्वे च्या आधारे पेगिंग प्लॅन बनवेल. तसेच महाट्रान्स्को लिमिटेड या विद्युत पुरवठा करण्याला कंपनीला सब स्टेशन बनविणे, , मेंटेनन्स डीपो बनविणे या करीत या सर्वेचा उपयोग होईल .