कोरोना या एका विषाणूने संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण आहे. तसेच या कोरोनामुळे गोरगरीब यांच्यावर संकट आले आहे. या कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे, तसेच सगळे सण- उत्सव यंदा हुकले आहे. नियमाचे पालन करून, तसेच लोकांमध्ये अंतर ठेवून अगदी साधेपणाने करण्याचे ठरवले जात आहे. यातलाच एक सण म्हणजे रमजान मुस्लिम बांधवांचा महत्वाचा सण. मग यामध्ये असणारे त्यांचे रोजे, नवीन वस्तू, नवीन कपडे , शीर खुर्मा याला अधिक महत्व दिल जात. पण कोरोना विषाणू संसर्गामुळे महामारीची स्थिती असल्या कारणाने रमजान हा सण अगदी सध्या पणाने साजरा होणार असल्याच पाहायला मिळत आहे.
रमजान महिना म्हटलं की सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. पण यंदा कोरोना मूळे ते पण नाहीसे झाले आहे.वर्षातला एक महिना “रमजान” हा सर्वात जास्त पुण्य मिळवण्याचा महिना असतो. या रमजानच्या काळात सर्वच गल्ली महोल्यात आनंदाचे वातावरण असते. नमाज साठी मस्जिद ही गच्च भरलेले असतात. मस्जिद बाहेरील परिसर सजवण्यात येतो. फळाची दुकानी, तसेच वेगवेगळ्या इतर पक्वान्न पदार्थाचे हाथ गाडे लागतात. लहान- मोठ्या सर्वांचीच नवीन कपडे खरेदीची लगबग असते. महिना भर ठेवलेले उपवास या साऱ्या आनंदाला द्विगणित करतात. मात्र या कोरोना महामारीच्या काळात. पण या साऱ्याच आनंदाला पुर्ण विराम मिळाला आहे आणि आम्ही आत्मनिर्भर झालो. इफ्तरीला लागणारा सर्वच पक्वान घरातच तयार करावे लागले,मस्जिद बंद असल्या मुळे पाच वेळची नमाज सोबतच तर्हवीची विशेष नमाज ही घरीच अदा करावी लागली. रस्त्यावरची गर्दी, दुकाने,हाथ गाडे, फेरीवाले, सारेच बंद असल्यामुळे, ईद साठी चे नवीन कपडे ते शिरखुर्मा साठी लागनारा सामान, या साऱ्या खरेदीची ईच्छाच मृत झाली. ह्या वर्षी रमजानचा आनंद ही अगदी स्वत: पुरताच मर्यादीत राहिलेला आहे.
पण हा रमजान सण काही लोकांनी अगदी सध्या पध्दतीने साजरा करायचं ठरवलं. आज देशावर आलेल्या संकटांमुळे आज देश नागरिक सगळे चिंतेत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि एकीकडे हा रमजान चा सण. सर काही चित्रच बदलून गेले आहे. आज कोरोनामूळे आर्थिकव्यवस्था संपूर्णतः ढासळलेली आहे, आज अशा परिस्थितीत आज काहींनी या कोरोनाग्रस्त लोकांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे दाखवून काहींना गोर गरिबांना मदत केली आहे. असच एक कुटुंब कुरेशी कुटुंबीयांनी आज रमजान या सणाच्या निमित्ताने उरलेल्या काही पैशांमधून आज कोरोनाग्रस्तांसाठी मदतीची हात दाखवून त्यांना मदत केली आहे.
रमजान या सणाच्या दिवशी मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. ईद, म्हणजेच आनंद, रमजान ईद ला ईद-उल-फित्र असे म्हणतात (फित्र्) म्हंजे दान करणे श्रीमंत लोकांन कडून गरिब,गरजू , लोकांन पर्यंत धन्य , ईद चा शुखा मेवा, नवीन कापडे पोहोचवणे तसेच स्वता: साठी व स्वतःच्या कुटुंबियांसाठी नवं नवीन कपडे खरेदी करणे ह्या सगळ्या गोष्टी असतात. मात्र ह्या वर्षी आम्ही ईद हा सण जरा वेगळ्या पद्धतीने साजरी करायची ठरवली. आज समाजामध्ये बरेच विविध लोक वावरत असतात हे कायम पाहत आलेलो आहोत. मात्र समाज त्या लोकांच्या माघे उभा असतो जे समाजाला विकासात्मक पाऊल उचलण्याचा मार्ग दाखवतात. तसेच समाजातील काही विचारवंत ,संस्था, संघटना, मौलवी, यानी वारंवार हे सुचना केल्या इद ही जरा वेगळ्या पद्धतीने साजरी करायची, अप्ल इतरत्र खर्च टळून ते गरिबांच्या पदरी टकायेचा, अर्थातच या कोरोना महामरी मुळे सगळ काही अस्त- व्यस्त झाल.आणि अशा परिस्थितीत आपण नवीन कपडे घालुन, गळा भेट घेउन ईद साजरी करणे हे चुकीचे आहे, करण आज आपल्या जिल्हतील ,शहरातील , गावतील , शेजारी, कोणास ठाऊक कितिक लोक आज, कोरना सारख्या माहामरीस झुंज देत आहे, असंख्य अडचणींचा समान करता आहे. समाजातील हथावर पोट असणाऱ्या लोकांनावर उपासमरिचि वेळ आली, अशा या आलेल्या परिस्थितीमुळे कुरेशी कुटुंबायांनी समजदार पणा दाखवून कोरोनाग्रस्तांना अर्थीक पैसा, अन्न धान्याची मदत करून यंदाचा रमजान हा सण साजरा करणार आहोत. असे कुरेशी कुटुंबीयांनी संवाद साधला आहे.
GIPHY App Key not set. Please check settings