दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी !!
दक्षिण भारतातून २६ डिसेंबर २०१९ रोजी कंकणाकृती सुर्यग्रहण दिसणार आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यात कंकणाकृती सुर्यग्रहण दिसणार असुन महाराष्ट्र सह उर्वरित भारतात मात्र खंडग्रास सुर्यग्रहण दिसणार आहे. सूर्यग्रहण ही एक दुर्मिळ व विस्मयकारक खगोलीय घटना आहे यामुळे सूर्यग्रहण पाहण्याची दुर्मिळ संधी गमावू नका.
साधारण दहा वर्षांनी दिसणार्या या कंकणाकृती सुर्यग्रहणा संदार्भातल्या असलेल्या अंधश्रद्धा दूर करण्याची शपथ घ्या आणि “भारतातून दिसणारे महान कंकणाकृती सूर्यग्रहण” सुरक्षितपणे पाहण्याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करा असे आवाहन करतो.
कुठून पाहाल?
ग्रहण पाहण्यासाठी आपल्या जवळ पूर्वेकडील खुले आकाश असलेली मोकळी जागा निवडा.
सुरक्षितपणे ग्रहण कसे पाहाल?
सूर्याकडे उघड्या डोळ्याने बघू नका. सूर्यग्रहण सर्वसाधारण “सनग्लासेस “ ने पाहणे सुरक्षीत नसते. सूर्य आणि सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास तयार करण्यात आलेले “ग्रहण चष्मे” वापरा. यासाठी अमेरिकेतील “ Thousand Oaks” या कंपनीने खास संशोधन करून तयार केलेले “ग्रहण चष्मे “ पाहण्यासाठी वापरा. त्यातून सूर्याकडून येणारी घातक अतिनील किरणे रोखली जातात.
सूर्यग्रहण चष्मे येथे उपलब्ध आहेत
अमेरिकेतील “Thousand Oaks” या कंपनीने खास संशोधन करून तयार केलेल्या फिल्म चे “ग्रहण चष्मे” सिडको, औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्रात उपलब्ध आहेत. तसेच दुर्बिणी द्वारे खंडग्रास सुर्यग्रहण दाखवण्याची व्यवस्था विज्ञान केंद्रात केली आहे.
“पहा-पेरा-वाचवा” या अभियानात सहभागी व्हा..!!
निसर्गाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन या ग्रहण चष्माच्या किटमध्ये पाच भारतीय वृक्ष प्रजातींच्या बिया असणार आहेत. म्हणजे ग्रहण तर पहायचेच, सोबत बिया ही पेरायच्या व यातुन आपल्या धरतीमातेचे संवर्धन करायचे, अशा ‘पहा-पेरा-वाचवा’ या आगळ्यावेगळ्या अभियानात सहभागी व्हा.
मराठवाड्यातील सर्व ठिकाणी खंडग्रास सुर्यग्रहण दिसणार आहे. त्याची सुरुवात व समाप्ती वेळ व ग्रहणाची टक्केवारी पुढील प्रमाणे
जिल्हा | स्पर्श वेळ | समाप्ती वेळ | ग्रहणाची %वारी |
औरंगाबाद | ०८:०६ | ११:०० | ७३.९५ % |
जालना | ०८:०६ | ११:०१ | ७१.१६ % |
बीड | ०८:०६ | ११:०२ | ६९.४८ % |
उस्मानाबाद | ०८:०६ | ११:०३ | ७५.९३ % |
नांदेड | ०८:०७ | ११:०५ | ७०.९७ % |
परभणी | ०८:०७ | ११:०४ | ७१.४४ % |
लातूर | ०८:०६ | ११:०४ | ७४.४१ % |
हिंगोली | ०८:०७ | ११:०५ | ७३.१६ % |
सूर्यग्रहण चष्मे येथे उपलब्ध आहेत
अमेरिकेतील “Thousand Oaks” या कंपनीने खास संशोधन करून तयार केलेल्या फिल्मचे “ग्रहण चष्मे” एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र एमजीएम स्पोर्टस् क्लब समोर, एमजीएम परिसर,
एन -६, सिडको, औरंगाबाद येथे उपलब्ध आहेत.
(फोन क्रमांक ०२४० २४८०५७७ / मोबाईल क्रमांक ९८५००८०५७७)
–
श्रीनिवास औंधकर
संचालक
एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबाद
GIPHY App Key not set. Please check settings