सौर ऊर्जेद्वारे सोलार पॉवर प्रकल्प उभारणे ही काळाची गरज असून सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाची सुरवात हे औरंगाबाद महानगर पालिकेचे स्मार्ट सिटीच्या दिशेने महत्वाचे पाऊल असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी येथे सांगितले.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या टाऊन हॉल येथील टप्पा क्र.3 इमारतीवर (रुफ टॉप) सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ.दिपक सावंत यांच्या हस्ते आज महानगरपालिका येथे करण्यात आला,त्यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर यावेळी महापौर नंदकुमार घोडले,खा.चंद्रकांत खैरे,स्थायी समिती सभापती गजानन बारवाल,जिल्हाधिकारी नवल किशोर राम,महानगर पालिका आयुक्त डी.एम.मुगळीकर यांच्यासह महानगर पालिकेच पदाधिकारी,लोकप्रतिनिधी ,अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ.सावंत म्हणाले की, राज्य शासनाच्या विकास कामात सौर ऊर्जा हा पर्यावरण संतुलनाचा कार्यक्रम अंर्तभूत असून त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगर पालिकेने सौर ऊर्जा प्राकल्पच्या कामाला प्रारंभ करुन महत्वाचे काम केले आहे.याद्वारे मनापाच्या विजेच्या बिलात मोठी बचत होऊन तो पैसा इतर विकास कामासाठी उपयोगात आणणे यामुळे शक्य होणार आहे.औरंगाबाद स्मार्ट सिटी बनवण्याच्या दिशेने आपल्याला याच पद्धतीने विविध लोकोपयुक्त नाविन्यपूर्ण उपक्रम येत्या काळात राबवायचे आहेत.त्यादृष्टीने सर्व लोकप्रतिनिधी,प्रशासकीय यंत्रणा यासर्वांनी परस्पर सहकार्य,समन्वयाने योजनांची यशस्वी अंमलबजावणी करावी.त्यासोबतच जिल्ह्यातील दुर्गम,ग्रामिण भागात तसेच प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधां पोहचविण्यासाठी आरोग्य विभाग ,संबंधित यंत्रणांनी अधिक सर्तक राहुन काम करावे,असे सांगून डॉ.सावंत पुढे म्हणाले की,जिल्हा रुग्णालय तसेच महिला रुग्णालयाच्या बाबत लवकरच काम सुरु करण्यात येईल.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मनपा आयुक्त मुगळीकर यांनी महानगर पालिकेच्या ट्पा क्र.3 येथे सुरु करण्यात येणा-या सौर पी.व्ही.प्रकल्पाद्वारे मिळणारे युनिट प्रति दिवस सरासरी 360 इतके असून सद्यस्थितीत विजेच्या दरानुसार (रु.14.50 प्रति युनिट दर ) दररोज 5220 रु.ची बचत होणार असल्याचे सांगितले.स्मार्ट सिटी योजने अंतर्गत औरंगाबादमध्ये ईलेक्ट्रीक बस,रिक्षा,स्मार्ट बसस्टॉप,दर्जेदार दळणवळण सुविधा,रस्ते ,वीजपूरवठा या मूलभूत सोयी सुविधांसोबत राबवण्यात येणा-या विकास कामांची माहिती श्री.मुगळीकर यांनी यावेळी दिली.
GIPHY App Key not set. Please check settings