दसऱ्याच्या मुहूर्तावर स्पाईसजेटने दिल्ली-औरंगाबाद-दिली विमानसेवेद्वारे औरंगाबाद मध्ये पुनरागमन केले. सकाळी 6 वाजता दिल्लीहून निघालेले विमान 7.50 मिनिटाने औरंगाबाद येथे दाखल झाले. या विमानाचे स्वागत परंपरेनुसार वॉटर सॅल्युटने करण्यात आले. पहिल्या दिवशी दिल्ली- औरंगाबाद दरम्यान 74 प्रवासी होते, आणि औरंगाबाद-दिल्ली दरम्यान 117 प्रवासी होते.
औरंगाबाद येथून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता लवकरच संध्याकाळचाा वेळेस दिल्ली सेवा, मुंबईसाठी विमानसेवा तसेच 27 ऑक्टोबर पासूूून हैदराबाद सेेवा सुरू करणार असल्याचे स्पाईस जेटच्या ब्रिजेश सिंग यांनी सांगितले.
प्रयत्नांना मिळाले यश
औरंगाबाद शहर हे पर्यटन आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने येथून विमानांची संख्या वाढविण्यासाठी विमानतळ संचालक डी. जी. साळवे, ATDF, टूर ऑपरेटर, CMIA, औद्योगिक संघटना, लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले.
उद्योजक सुनीत कोठारी, राम भोगले आणि जसवंत सिंग यांनी मागील 6 महिन्यांपासून सातत्याने नवीन हवाई सेेवेेसाठी प्रयत्न केले, त्याला आज पाहिले यश मिळाले.
सोशल मीडियावर औरंगाबाद पेजच्या माध्यमातून यासाठी एक स्वतंत्र कॅम्पेन चालवण्यात आले होते. ‘Aurangabad For Imrove Air Connectivity‘ या कॅम्पेनद्वारे नागरी विमान वाहतूक मंत्रालय, सरकारी आणि खासगी विमानसेवा देणाऱ्या कंपन्या यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा घेण्यात आला आहे, आणि यापुढेही हवाई सेवा वाढविण्यासाठी या फोरमच्या माध्यमातूनप्र यत्न केले जातील.
उद्योजकांनी कार्गोची हमी दिल्यास तात्काळ सेवा सुरू करणार:विमानतळ संचालक
उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय कार्गोची हमी घेतल्यास तात्काळ सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. विमानतळ संचालक डी. जी. साळवे यांनी आंतरराष्ट्रीय कार्गोसाठी लागणारी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले, तसेच 20 तारखेनंतर उद्योजकांसोबत यासंदर्भात बैठक घेण्यात येईल अशी माहिती दिली.
GIPHY App Key not set. Please check settings