जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची जिल्हाधिकारी पदी नियुक्त करण्यात आली असून ते उद्या पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.
जिल्हाधिकारी पदावर एक वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ लाभलेले नवलकिशोर राम यांची जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत उलेखनीय काम केले. यासोबतच शहरात कचरा प्रश्न पेटल्याने तत्कालीन आयुक्त डी.एम. मुगळीकर यांना हटविल्यानंतर त्यांच्याकडे मनपा आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार होता. मागील महिनाभरात यांनी मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या.
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या बदलीला स्थगिती
जिल्हा प्रशासनाचा प्रभारी कारभार अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांच्याकडे देण्यात आला आहे. कर्नाटक निवडणुकीमुळे चव्हाण यांच्या बदलीला स्थगिती दिल्याची चर्चा सध्या केली जात आहे.