स्वच्छ सर्वेक्षण २०१९ : औरंगाबाद देशात २२०व्या स्थानी, महाराष्ट्रात शेवटून दुसऱ्या स्थानावर

0
498

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ चा आज निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये औरंगाबाद शहराचे निराशाजनक प्रदर्शन या वर्षी ही कायम राहिले आहे. औरंगाबाद शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशपातळीवर २२०व्या स्थानी आणि महाराष्ट्रातील शहरांपैकी शेवटून दुसऱ्या स्थानी आहे. एकूण ५००० पैकी औरंगाबादला केवळ २१८३ गुण मिळवता आले. केंद्र सरकारने आखून दिलेल्या कोणत्याही नियमात चांगले काम औरंगाबाद मनपाला करता आले नाही. औरंगाबादचा कचरा प्रश्न सुटावा या करिता विशेष दिल्लीमधून या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असलेले डॉ. निपुण विनायक यांची औरंगाबाद मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली, परंतु शहराची परिस्थिती जैसे थेच राहिली.

वर्षभरापासून औरंगाबादला भेडसावत असलेला कचरा प्रश्न मार्गी लावण्यात अजूनही स्थनिक प्रशासनाला यश आले नाही. आणि तेच औरंगाबादच्या वाईट कामगिरीला कारणीभूत ठरले.  महापौर, मनपा आयुक्त यांनी वेळोवेळी परीस्थित बदल घडेल असे आश्वासन देत आले, पण शहराच्या परीस्थित काहीच फरक पडला नाही. शहराला स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये ११५व्या नंबरवर असलेले स्थान देखील टिकवता आले नाही.

या उलट ‘स्वच्छ सर्वेक्षण –2019’ मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहेतर स्वच्छ सर्वेक्षणात बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा  तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला  मिळवला आहे.केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील 423 शहरांची रॅकिंग जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या 100 शहरांत महाराष्ट्रातील 24 शहरांचा समावेश आहे. या शहरामध्ये नवी मुंबई (7), कोल्हापूर (16), मीरा-भाईंदर (27), चंद्रपूर (29), वर्धा (34), वसई-विरार (36), पुणे (37), लातूर (38), सातारा (45), पिंपरी-चिंचवड(52), उदगीर (53), सोलापूर (54), बार्शी (55), ठाणे (57), नागपूर (58), नांदेड-वाघाळा (60), नाशिक (67), अमरावती (74), जळगाव (76), कल्याण-डोबिंवली (77), पनवेल (86), अचलपूर (89), बीड (94) व यवतमाळ (96) या शहरांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here