एकेकाळी मराठवाड्याची शान असलेल्या संत एकनाथ रंगमंदिराची अवस्था, सरकारी अनास्थेमुळे गेल्या काही वर्षात अत्यंत खराब झाली आहे. तुटलेली आसनव्यवस्था, मोडकळीस आलेला स्टेज, खराब प्रकाश आणि ध्वनी व्यवस्था, घाणेरडी स्वच्छतागृह याच्या विरोधात शहरातील रंगकर्मी, नाट्यरसिक, आणि अनेक कलाकारांनी अनेकदा नापसंती दर्शवली तसेच वेळोवेळी आंदोलने केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले अशी शक्यता सध्या दिसत आहे. औरंगाबाद महानगरपालिकेचा अखत्यारित असलेल्या संत एकनाथ नाट्यगृहासाठी मनपाने PMC आणि तसेच विविध विकासकामांसाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहे.
प्रोजेक्ट मैनेजमेंट कन्सल्टंट आणि महाराष्ट्र सरकारच्या नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या निविदेमध्ये रंगमंदिराच्या स्थापत्य, ध्वनी, प्रकाश व्यवस्था, आसनव्यवस्था, स्टेज इत्यादी कामाचा समावेश आहे. सदरील कामासाठी दीड करोड रुपयाचा निधी प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करण्यात आला आहे.
प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निविदा खालीलप्रमाणे
रंगमंदिराच्या विविध कामासाठी प्रसिद्ध केलेल्या निविदेमध्ये खालीलप्रमाणे कामांचा समावेश करण्यात आला आहे. सदरील निविदा दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ रोजी उघडण्यात येईल. निवड झालेल्या कंपनीला १२० दिवसाच्या मुदतीमध्ये ठरलेले काम करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
[wpdm_package id=’2278′]
[real3dflipbook id=”12″]
प्रोजेक्ट मैनेजमेंट कन्सल्टंटसाठी मागवलेली निविदा
[wpdm_package id=’2279′]
[real3dflipbook id=”13″]
मनपाने रंगमंदिराचे बुकिंग बंद करावे: प्रेषित रुद्रवार
रंगमंदिराची बकाल अवस्था बघता, मनपाने दुरुस्ती होईपर्यंत रंगमंदिराची बुकिंग थांबवावी, आणि रंगमंदिरात कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, आम्हला प्रसानाच्या वतीने ३१ जानेवारीपर्यंत मुदत मागण्यात आली होती. अपेक्षा आहे तोपर्यंत योग्यटी पाऊले प्रशासन उचलतील, अन्यथा 1 फेब्रुवारी रोजी औरंगाबादच्या नाट्यरसिकांना रस्त्यावर उतरण्यावाचून पर्याय राहणार नाही.
रंगमंदिराच्या कामासाठी निविदेला मुहूर्त लागल्याने शहरातील अनेक नाट्यरसिकांनी समाधान व्यक्त केले. पण मनपाच्या इतर निविदेसारखे या कामासाठी पण कोणी पुढे आले नाही, तर काम रखडेल अशी भीती पण यावेळी व्यक्त केली.
GIPHY App Key not set. Please check settings