आमच्यावर विश्वास ठेवून जनतेने महापालिकेत सत्ता दिली, पण शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यात अपयश आले. या त्रासाबद्दल शहरवासीयांची जाहीर माफी मागतो. येत्या दहा दिवसांत कचऱ्याची समस्या दूर करण्यात येईल,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत औरंगाबादकरांची माफी मागितली.
ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या बैठकीपूर्वी महापौर नंदकुमार घोडेले, खा.चंद्रकांत खैरे, पालकमंत्री डॉ.दीपक सावंत, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि मनपा अधिकाऱ्यांचीबैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, कचऱ्याची समस्या बिकट झाली असून त्याला गती नाही. औरंगाबादवासियांची दिलगिरी मागतो. हे काम शासन, प्रशासनाचे आहे. औरंगाबादकरांनी आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे, त्यामुळे त्यांची क्षमा मागतो. आज जी चर्चा झाली आहे, त्यानुसार मनपा अधिकाऱ्यांनी ८ ते १० दिवसांत कचराकोंडी सुटेल, असे आश्वासन दिले आहे. या विषयात राजकारण आणू इच्छित नाही. शहराला मनपा आयुक्त नाही. पोलीस आयुक्त प्रभारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची बदली केली. या सगळ्या बाबींमध्ये मार्ग काढणे सुरू आहे. नागरिकांंना त्रास होतो आहे, नागरिकांची पुन्हा एकदा क्षमा मागतो. शहराची कचराकोंडी लवकरच फुटेल. कचरा टाकण्यासाठी जेथे पालिका गेली तेथे विरोध झाला. सर्वांनी सहकार्य करावे.
१० दिवसात कचरा प्रश्न सुटला नाही तर मला वेगळा विचार करावा लागेल, अश्या कडक शब्दात त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले आणि खासदार खैरे यांना सुनावले.
GIPHY App Key not set. Please check settings