जागतिक वारसा शहर ‘युनेस्को’ वारसास्थळांच्या यादीत औरंगाबादेतील ६४ स्थळांचा समावेश होण्याची शक्यता असून, त्यासाठी पुरातत्व विभागाने पुढाकार घेतला आहे.
२०१८च्या मध्यात केंद्र सरकारकडे सादर केरणार अतिंम प्रस्ताव
औरंगाबाद ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर आहे. येथील वारसास्थळांची दखल घेऊन राज्य शासनाने शहराचा समावेश ‘युनेस्को’ वारसास्थळांच्या यादीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. दोन वर्षापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर विभागीय आयुक्त, महापालिका, राज्य पुरातत्व विभागाने ‘युनेस्को’च्या दृष्टीने तयारी सुरू केली. राज्य पुरातत्व विभागाच्या दोन पथकांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर ६४ वारसास्थळे (वास्तू) ‘युनेस्को’ यादीसाठी पात्र ठरू शकतील, असे लक्षात आले. या स्थळांची यादी राज्य पुरातत्व विभागाच्या संचालक कार्यालयाकडे पाठवली आहे. ‘युनेस्को’साठी हजार ते दीड हजार पानांचा प्रस्ताव तयार करावा लागणार आहे. हा प्रस्ताव २०१८च्या मध्यात केंद्र सरकारकडे सादर केला जाईल, अशी माहिती राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी दिली.
यादीतील वारसास्थळे
1. नवखंडा दरवाजा
2. तटबंदी (संपूर्ण शहराभोवती, बेगमपुरा, बायजीपुरा)
3. नवखंडा पॅलेस तटबंदी
4. किलेअर्कची तटबंदी
5. किलेअर्क
6. इदगाह
7. काली मशीद (शहाबाजार, नवाबपुरा, बेगमपुरा)
8. जामा मशीद
9. अलमगीर मशीद
10. अरब मशीद
11. उडासी डेरा
12. प्रिन्स मशीद
13. चंपा मशीद
14. चिताखाना
15. बाबा मुसफर दर्गा
16. निझामुद्दीन अवलिया
17. शहानूरमिया दर्गा
18. रोझा इस्माईल दर्गा
19. गुजराती शहा साहेब दर्गा
20. कदीर अवलिया साहेब दर्गा
21. सुफी शहा गुलाम हुसेम दर्गा
22. शाह अली दर्गा
23. हैदर हुसैनी दर्गा
24. गुलशन महल
25. थत्ते हौद
26. हिमायतबाग
27. मुगल गेस्ट हाउस
28. सुफी संतांचे स्मारक
29. हर्सूल जेल
30. पैठण दरवाजा
31.रंगीन गेट
32. काला दरवाजा
33. नौबत दरवाजा
34. महेमूद दरवाजा
35.बारापुल्ला दरवाजा
36. हाथी दरवाजा
37. खुनी दरवाजा
38. कटकट दरवाजा
39. रोशन गेट
40. रोजाबाग
41. इदगाह
42. तुटा मकबरा
43.दोन दरवाजा
44. मगनलाल की देवडी
45. जिल्हा परिषद कार्यालयाची इमारत
46. इब्राहीम खान देवडी
47.कुतूबपुरा दर्गा
48. फक्रुद्दीन टिमनोजी दर्गा
49. कसूपारख
50. जयसिंग छत्री
51. बायजीपुरा येथील बांधकामे
52. चिमणाराजा हवेली,
53. मन्ना राजा हवेली
54.गोमुख
55. हर्सूल दर्गा
56. अरब खिडकी
57. मशजीद मजील बेग
58. हमामखाना
59.नहरींचा शिल्लक भाग