जालना रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होणार, लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्ता रुंदीकरणाच्या कामाची निविदा अखेर मंजूर

0
389

शहर विकास योजनेतील लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्त्याच्या  कामाची निविदा अखेर गुरुवारी मंजूर झाली. तब्बल 13 कोटी 67 लाख रुपये खर्चून बारा महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. हा रस्ता जालना रोडला समांतर ठरणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर जालना रोडवरील सुमारे 30 टक्के वाहतूक कमी होण्याचा अंदाज आहे.

लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेला २० वर्षे लागले. २०११ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी रस्ता रुंदीकरण करून दिले. या रस्त्याच्या कामासाठी महापालिकेला तब्बल ७ वर्षे लागले. १४ कोटी रुपये खर्च करून सिमेंट रस्ता तयार करण्याची निविदा आज आयुक्तांकडे मंजुरीस्तव ठेवली.

जालना रोडला पर्यायी रस्ता म्हणून लक्ष्मण चावडी ते एमजीएमकडे बघितले जाते. महावीर चौक ते सिडको बसस्थानकाकडे जाणार्‍या वाहनधारकांना जालना रोडवरून ये-जा करायची नसेल, तर वरद गणेश मंदिर ते थेट एमजीएमपर्यंत येता येईल. हा रस्ता अनेक वर्षे रुंदीकरणामुळे रखडला होता. अनेक महापौरांनी, आयुक्तांनी रुंदीकरणासाठी जंगजंग पछाडले; पण रुंदीकरण झाले नव्हते. २०११ मध्ये तत्कालीन आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी रस्ता रुंद करून दिला. काही मालमत्ताधारकांनी रुंदीकरणात जागा गेली पण मोबदला मिळाला नाही, म्हणून न्यायालयात धाव घेतली. मनपा अधिकार्‍यांना एवढेच निमित्त सापडले. मागील ७ वर्षांमध्ये नागरिकांसोबत कोणतीही वाटाघाटी न करता प्रश्न तसाच प्रलंबित ठेवला.

२ जानेवारी २०१७ रोजी तत्कालीन महापौर बापू घडमोडे यांनी वादग्रस्त मालमत्ता सोडून रस्त्याचे काम सुरू करावे, असे निर्देश दिले, बापू यांच्या घोषणेला वर्ष उलटले तरी मनपा प्रशासनाने काम सुरू केले नाही. शेवटी आयुक्त डी.एम. मुगळीकर, महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांनी जोरदार प्रयत्न केल्यानंतर महापालिकेने १४ कोटी रुपयांची निविदा काढली. ए.एस. कन्स्ट्रक्शनने ५ टक्के कमी दराने निविदा दाखल केली.

जालना रोडचा ताण कमी होणार
जालना रोडवर २४ तासांत साडेपाच लाखांहून अधिक वाहने ये-जा करतात. वाहनधारकांना पर्यायी रस्ताच नसल्याने अनेकदा वाहतूक कोंडी, सिग्नलमध्ये अडकून पडावे लागते. लक्ष्मण चावडी ते एमजीएम हा सिमेंट रस्ता तयार झाल्यावर अनेक वाहनधारक याच रस्त्याचा वापर करतील. जालना रोडवरील तीस टक्के कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Previous articleCity of Hidden Wonders Bhadkal Darwaja: Tall and Imposing
Next articleNo industrial unrest at Aurangabad plant: Videocon
CityKatta : Aurangabad's own social media platform

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here