माझं औरंगाबाद, स्वच्छ आणि सुंदर… क्रांती चौक मोहीम फत्ते!
[g-slider gid=”1488″ width=”100%” height=”55%”]
क्रांती चौक उड्डाणपुलाखाली चौकामध्ये लावलेले पोस्टर, औरंगाबादमधील काही तरुणांनी एकत्र येऊन काढले.
सार्वजनिक ठिकाणी पोस्टर चिकटवून विद्रुपीकरण सुरूच आहे. स्थानिक प्रशासनसुद्धा लोकांविरोधात कोणतीही कारवाई करतांना दिसत नाही. असाच काही प्रकार क्रांती चौकातील उड्डाणपुलाखाली सर्रास चालू असतो. शहरातील मंदार लोखंडे, योगेश ओलेकर, ज्ञानेश्वर मुळे या तरुणांनी मात्र एकत्र येऊन स्वच्छता मोहीम राबवण्याचे ठरवले आणि काल या परिसरातील सर्व अनधिकृत पोस्टर्स काढून टाकली
शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी असे अनेक पुढाकार गरजेचे आहे.
GIPHY App Key not set. Please check settings