in

संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सर्वंकष विकास करताना या परिसरात पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वसमावेशक आराखडा आणि संकल्पना तयार करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल दि. 25 ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी वरील निर्देश दिले.

पैठण तसेच औरंगाबादच्या पर्यटनावर चर्चा करण्यासाठी बैठक 

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदिपानराव भुमरे यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

उद्यान विकसित करण्यासाठी आराखड्यांचे सादरीकरण

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्याचे नूतनीकरण करून हे उद्यान विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. हे उद्यान विकसित करताना जनतेच्या आशा-अपेक्षा जाणून घेण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्याशिवाय स्पर्धात्मक पद्धतीने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि जनतेकडून उद्यान विकासाचे आराखडे मागविण्यात आले होते. औरंगाबादच्या एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आराखड्याचे तसेच वास्तुविशारद पी. के. दास यांनी तयार केलेल्या आराखड्याचे आज आयोजित बैठकीत सादरीकरण करण्यात आले.

सर्वंकष आराखडा तयार करण्याच्या सूचना

औरंगाबाद परिसरात टुरिझम सर्किट विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याबरोबरच पैठणच्या नाथसागर परिसरात अधिकाधिक पर्यटकांनी यावे याकरिता आवश्यक त्या सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तर औरंगाबाद विमानतळाचे आंतरराष्ट्रीय विमानतळात रुपांतर केल्यास तसेच वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्यास विदेशी पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या संकल्पनांची छानणी प्रक्रिया 15 दिवसांच्या आत पूर्ण करण्यात येईल, असे औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

What do you think?

Written by Admin

CityKatta : Aurangabad's own social media platform

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

स्मार्ट औरंगाबादसाठी मिळणार अतिरिक्त ₹1000 कोटी; १५व्या वित्त आयोगाच्या शिफारसीमध्ये भारतातील ८ शहरात मिळवले स्थान

औरंगाबाद विमानतळ: सलग तीन वर्षे देशातील गटातील सर्वाधिक तोटा असणाऱ्या विमानतळाच्या यादीत