2 मे 2020 | सकाळी 09 वाजता
कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आज सकाळी आणखी 23 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबादेत रुग्णसंख्या पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता 239 वर जाऊन पोहोचला आहे.
यामध्ये नूर कॉलनी 5, बायजीपुरा 11, किलेअर्क भीमनगर 1, कैलासनगर 3, समतानगर 2, जयभीमनगर 1 असे 22 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले आहे, अशी माहिती शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
काल दिवसभरात 39 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची भर पडली होती.
GIPHY App Key not set. Please check settings